breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवाराची यादी तयार , पहा कोण आहेत उमेदवार

  • पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या बारा संभाव्य उमेदवार यादी लवकरच जाहीर होणार 

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पहिल्या टप्प्यात बारा उमेदवारांची यादी तयार केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून येत्या दोन दिवसात पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या यादीत पुण्यातील बारामती – सुप्रिया सुळे, शिरुर – डाॅ. अमोल कोल्हे आणि मावळ – पार्थ पवार हे उमेदवार असणार आहेत.  

लोकसभा निवडणूक-२०१९ साठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची पहिला यादी तयार झाली आहे. येत्या दोन दिवसांत ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असून पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार  यांना रिंगणात उतरविले आहे.

निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या. लोकसभा निवडणुकीच्या ७ टप्प्यांपैकी पहिल्या चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ जागांसाठीचं मतदान होईल. महाराष्ट्रात ११ एप्रिलला ७ मतदारसंघात, १८ एप्रिलला १० मतदारसंघात, २३ एप्रिलला १४ मतदारसंघात आणि २९ एप्रिलला १७ मतदारसंघात मतदान होणार आहे.  तर २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.

राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार यादी

ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील

बारामती – सुप्रिया सुळे

नाशिक – समीर भुजबळ

बुलढाणा – राजेंद्र शिंगणे

सातारा – छत्रपती उदयनराजे भोसले

मावळ – पार्थ पवार

कोल्हापूर – धनंजय महाडिक

भंडारा – गोंदिया – वर्षा पटेल

जळगाव – गुलाबराव देवकर

रायगड – सुनील तटकरे

शिरूर – अमोल कोल्हे

ठाणे – आनंद परांजपे

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचा यापुर्वी बालेकिल्ला म्हणून गणला आहे. यामध्ये बारामती, शिरुर, मावळ, कोल्हापुर आणि सातारा या लोकसभेच्या पाच ठिकाणी लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार तयार आहेत. मात्र, माढा लोकसभा निवडणुकीतून शरद पवार यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने त्या जागेवर पेच निर्माण होणार आहे. माढा लोकसभा हा राष्ट्रवादीचा हक्कांचा मतदार संघ आहे. त्या जागेवर विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील किंवा प्रभाकर देशमुख यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार हे अद्याप निश्चित नाही. परंतू, शरद पवार यांनी लोकसभा निवडणुक लढविण्याबाबत पुन्हा विचार करावा, असे सुचित वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिंरजीव रणजितसिंह मोहिते पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने त्या जागेवर लवकरच तोडगा काढावा लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची यादी दोन दिवसात जाहीर होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button