‘लॉकडाउन’चे उल्लंघन करणे नवरदेव आणि वरातीला चांगलेच पडले महागात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/11-4.jpg)
मुंबई | महाईन्यूज
सध्या कोरोना विषाणुमुळे उभा देश बंद असताना लॉकडाउनचे उल्लंघन करणे नवरदेव आणि वरातीला चांगलेच महागात पडले आहे. दोन मोटारीमधून गुप्तपणे मेरठला जाणाऱ्या वधूसह सात वरातींना पोलिसांनी अटक केली आहे. हे सातजण मेरठच्या शामनगरमध्ये निकाह कार्यक्रमात जात होते. त्यांच्याजवळून दोन अंगठ्या आणि लग्नाचे कार्ड जप्त केले आहे.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली आहे. अटक केलेल्या नवरदेवाचा सोमवारी निकाह होता.
खाक्या दाखविताच कारचालक पोपटासारखा बोलला
कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन असून या काळात सामाजिक, धार्मिक कार्यक्रमावर बंदी आहे. पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक ओ.पी.सिंग यांनी सांगितले कि रविवारी रात्री पोलिस रावली रोडवर गस्त घालत होते. यादरम्यान दोन कार येताना दिसल्या. पोलिसांनी दोन्ही गाड्या अडवून त्यांची चौकशी केली. त्यावर कार चालकांनी सांगितले की, ते नूरगंज येथील ताजुद्दीनची वरात घेऊन मेरठ शामनगर लिसाडी गेटला जात होते.
पोलिसांनी निकाह परवानगी पत्र मागितल्यावर आरोपींनी समाधानकारक उत्तर दिले नाही. कारमधून दोन अंगठ्या आणि लग्नाचे कार्ड जप्त केले. या प्रकरणात नवरदेव ताजुद्दीन, वराती वकील, कमरुद्दीन, मेहबूब, फैयाज, इकरामुद्दीन, सलमान रहिवासी नूरगंज कॉलनी यांना अटक केली आहे