breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘लैला हो लैला… कैसी हो लैला…’ गीतावर भाजपचा नगरसेवक झाला ‘मजनू’

उदगीर (प्रतिनिधी) – श्री गूरु हावगीस्वामी याञेनिमित्त उदगीरमध्ये नगरपालिकेच्या वतीने उदयगिरी महोत्सव भरवला जातो. यानिमित्त नागरिकांना सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी दिली जाते. मात्र, नगरपालिकेने यावर्षी सांस्कृतीक कार्यक्रमाच्या नावाखाली बिभत्स नृत्य करणा-या नर्तकींचे सादरिकरण ठेवून अश्लीलतेचा कळस गाठला. न्यायालयाने डान्स बारला मंजुरी देताच सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी अश्लीलतेचे प्रदर्शन भरवून तरुणांना वाम मार्गाला लागण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप सामाजिक स्तरातून केला जात आहे.

उदगीर नगरपालिकेच्या वतीने उदयगिरी महोत्सव आयोजित केला आहे. त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली हिंदी, मराठी गीतांवर अश्लील नृत्यांचे सादरिकरण करणारा कार्यक्रम ठेवला. या महोत्सवामध्ये नर्तकीने बालगौपाळांच्या समोर बोल्ड डान्स सादर केला. महिला डान्सरने स्टेज सोडताच नगरसेवक गायकवाड यांचा देखील ताबा सुटला. त्यांनी सुध्दा नर्तकीसोबत लैला हो लैला… या हिंदी चित्रपटातील गाण्यावर ठेका धरला.

त्यामुळे समाजात भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून बिभत्स आणि अश्लीलतेचे प्रदर्शन भरविल्याचा संदेश गेला आहे. अखंड तरुणाईला चिथवल्याचा आरोप सामाजिक स्तरातून भाजपवर होत आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे सुद्धा या कार्यक्रमास उपस्थीत होते. व्यासपीठावरील फ्लेक्सवर पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह मंत्री आणि स्थानिक नेत्यांचे फोटो आहेत. त्यामुळे सर्वत्र हीच का भाजपची संस्कृती अशी चर्चा केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button