लसीला परवानगी मिळण्याआधीच औरंगाबादेत काळाबाजार सुरू
![# Covid-19: Vaccinating 13 crore people in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/covid_vaccine.jpg)
- २३०० रुपयांत लसीकरण
औरंगाबाद – कोरोनावर रामबा उपाय म्हणून लसीची वाट संपूर्ण जग पाहत आहे. त्यातच, भारतात पुढच्या वर्षात लस उपलब्ध होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. मात्र, औरंगाबादच्या काळ्या बाजारात लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. म्हणजेच, लसीला परवानगी मिळण्याआधीच लसीचा काळाबाजार सुरू झाला आहे. तर लसीसाठी काही महाभागांनी थेट मुंबई-पुणं गाठलं आहे. या धक्कादायक प्रकाराची आरोग्य खात्यानं आता चौकशी सुरू केली आहे.
कोरोनावरील लसीकरण भारतात अद्यापही सुरु झालेलं नाही. हे लसीकरण मोफत होणार पैशांनी हेदेखील अद्याप ठरलेलं नाही. सरकारकडून लसीकरणाचा कार्यक्रम आखण्यात येत आहे. मात्र, औरंगाबाद, पुणे, मुंबई या ठिकाणी काळ्या बाजारात चक्क 2300 रुपये मोजले गेले. त्यामुळे औरंगाबादमध्ये ‘चोरी चोरी चुपके चुपके’ कोरोना लसीकरणाची चर्चा सुरु झाली आहे.
अति घाई, संकटात नेई.. असं म्हणतात. कोरोना लसीला अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर सरकारी नियमानुसार लसीकरण मोहीम राबवण्यात येणाराय. पण त्याआधीच घाई केल्यास हा उतावीळपणा जीवावर बेतू शकतो.