breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

लवकरच शंभराची नवी नोट चलनात!

मुंबई – शंभर रुपयांची नवीन नोट चलनात आणणार असल्याची घोषणा आज रिझर्व्ह बॅंकेकडून करण्यात आली आहे. ही नोट लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.

या नव्या नोटेचे फोटो आरबीआयने नुकतेच जारी केले आहेत. या नव्या नोटेचा रंग हलकासा जांभळा असून त्यावर गुजरातच्या ऐतिहासिक राणीच्या विहिरीचे छायाचित्र आहे. या नोटेच्या डिझाईनला म्हैसूरच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. याच प्रेसमध्ये 2000 रूपयांच्या नव्या नोटांची छपाई होते.

या नोटेची साइज 66 मिमी X 142 मिमी असेल. ही नोट सध्या अस्तिवात असलेल्या 100 रूपयांच्या नोटेपेक्षा छोटी आणि 10 रूपयांच्या नोटेपेक्षा मोठी असेल. ही नोट बाजारात आल्यानंतर छपाईचा वेग वाढवण्यात येईल, असे आरबीआयने म्हटले आहे.

ही नवी नोट ऑगस्ट अखेरपर्यंत बॅंकांच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहे. दरम्यान, आरबीआयने नोटाबंदीनंतर दोनशे, दहा रुपये आणि पन्नास रुपयाची नवी नोट जारी केली होती. या नोटा आता बाजारात उपलब्ध आहेत. त्यानंतर पुन्हा एक नवी नोट जारी केली जाणार आहे. नवी नोट जारी करण्यात आली असली तरी जुनी शंभरची नोटही चलनात असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button