breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
रोहित-आदित्य यांची गळाभेट, अजित पवारांना पदस्पर्श, सुप्रिया सुळे आमदारांच्या स्वागताला
मुंबई : विधानभवनात नवनियुक्त 288 आमदार विधानसभेच्या सदस्यपदाची शपथ घेत आहेत. आमदारांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे स्वतः विधीमंडळाच्या गेटवर उभ्या होत्या. विधीमंडळात पाऊल ठेवणारे आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांची गळाभेट घेत सुप्रिया सुळेंनी स्वागत केलं. तर अजित पवार यांच्या पाया पडत त्यांनी मिठी मारली.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन आज (बुधवार 27 नोव्हेंबर) बोलावण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेले ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देत आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून शपथविधी सुरु झाला.