breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

रेल्वे फलाटांवर ‘अधिकृत’ फेरीवाले

अनधिकृत फेरीवाल्यांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेची सुविधा; मेल-एक्स्प्रेस प्रवाशांसाठी फलाटावर परवानाधारक फेरीवाल्यांमार्फत खाद्यपदार्थ विक्री

रेल्वे फलाटांवरील अनधिकृत फेरीवाल्यांना रोखण्यासाठी व उत्पन्नवाढीसाठी मध्य रेल्वेने मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी ‘अधिकृत’ फेरीवाला नावाने नवीन सुविधा आणली आहे. फलाटांवरील परवानाधारक फेरीवाल्यांमार्फत प्रवाशांना खाद्यपदार्थाची विक्री केली जाणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सीएसएमटी, एलटीटीसह अन्य स्थानकांत अशा प्रकारची  सुविधा पहिल्यांदाच सुरू करण्यात येत असून १८० जणांची नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

एखादी मेल-एक्स्प्रेस स्थानकात उभी असेल, तर फलाटावर खाद्यपदार्थाची विक्री करणारा बेकायदा फेरीवाला प्रवाशांना खाद्यपदार्थ विकतो. फलाटावर रेल्वेचा स्टॉल असूनही प्रवासी गाडी सोडून जाऊ शकत नाही. हीच संधी साधून बेकायदा फेरीवाले खाद्यपदार्थ किंवा पाण्याच्या बाटल्या विकतात. नाइलाजास्तव त्याला प्रवासीही साथ देतात. यात रेल्वेचे उत्पन्न बुडते. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांना रोखण्यासाठी मेल-एक्स्प्रेस प्रवाशांना फलाटावरील रेल्वेच्याच परवानाधारक फेरीवाल्यांकडून खाद्यपदार्थ व अन्य सुविधा मिळाली तर उत्पन्नही वाढेल, या उद्देशाने अशा प्रकारची नवीन सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्.ात आला आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ज्या-ज्या स्थानकात मेल-एक्स्प्रेस गाडय़ा थांबतात, तेथील स्टॉलधारकांना या सुविधेत सामावून घेतले आहे. फलाटावरील एका स्टॉलधारकाकडून एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाईल व तो कर्मचारी थांबलेल्या मेल-एक्स्प्रेस प्रवाशांना फलाटावर खाद्यपदार्थाची विक्री करेल. गाडीत मात्र विक्रीला परवानगी नसेल. त्यामुळे प्रवासी जरी गाडीत बसलेला असेल, तरीही त्याच्यापर्यंत पोहोचून पदार्थ विकणार असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि स्टॉलधारकाबरोबरच रेल्वेचेही उत्पन्न वाढेल. सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, रोहा, ठाणे, आसनगाव, इगतपुरी, नेरळ, कर्जत, लोणावळा स्थानकांतील फलाटांवर खाद्यपदार्थाची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बेकायदा फेरीवाल्यांकडे रेल्वेचेही दुर्लक्ष

अनधिकृत फेरीवाल्यांना रोखण्यासाठी परवानाधारक फेरीवाल्यांची नियुक्ती केली जाणार असली तरी अनधिकृत फेरीवाल्यांना आळा घालण्यात रेल्वे प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. मेल-एक्स्प्रेस फलाटांवर व मोठय़ा प्रमाणात गाडय़ांतही ते  खाद्यपदार्थ व वस्तूंची विक्री करीत  असतात. त्याकडे  रेल्वे प्रशासनही दुर्लक्ष करते.

अनधिकृत फेरीवाल्यांना रोखण्यासाठी रेल्वेने परवानाधारक फेरीवाले नेमण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉलधारकाकडून एका कर्मचाऱ्यावर फेरीवाल्याचे काम सोपविले जाईल. त्यासाठी रेल्वेने प्रत्येक फेरीवाल्यामागे पाच टक्के परवाना शुल्क आकारले आहे. अशा १८० जणांची नियुक्तीही केली जात आहे.

– रॉबिन कालिया, वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button