breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
राहुल गांधी १२ जूनला मुंबई दौऱ्यावर
मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १२ जून रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. भिवंडी कोर्टात सुरु असलेल्या खटल्यासंदर्भात ते मुंबईत येणार असल्याची माहिती मिळते आहे. भिवंडीत जाऊन आल्यानंतर राहुल गांधी यांची गोरेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेत ते बूथ लेव्हलच्या पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
महात्मा गांधी यांच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग होता असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. ज्यानंतर संघ कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्यावरिोधात मानहीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी आरोप निश्चिती करण्याआधी राहुल गांधी यांचे म्हणणे नोंद करून घ्यायचे आहे असे कोर्टाने म्हटले आहे. आता भिवंडी दौऱ्यादरम्यान आणि गोरेगाव या ठिकाणी राहुल गांधी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.