Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने शिवसेनेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/1-7.jpg)
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांचे पुत्र कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने यांनी यापूर्वीच मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधून घेतले आहे.
निवेदिता माने यांनी हातकणंगले मतदार संघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे या मतदार संघातून विद्यमान खासदार आहेत. हा मतदारसंघ आगामी लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींना सोडण्याच्या निर्णयामुळे माने गट नाराज होता. त्यामुळे यापूर्वीच माने गटाचे नेत धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.