राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख प्रकरणात पोलिसांनी केला मोठा खुलासा
औरंगाबाद – राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब इब्राहिम शेख यांच्यावर एका उच्चशिक्षीत तरुणीवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, औरंगाबाद पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
वाचा :-रत्नागिरीत ५० फूट खोल दरीत कोसळली बस; चिमुकल्याचा मृत्यू
मागील 1 वर्षात मेहबूब शेख आणि तरूणी यांच्यात कुठलाही संपर्क नसल्याचे तांत्रिक पुराव्याच्या आधारे समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. शेख यांच्यावर झालेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी 3 पथके तयार करण्यात आली आहेत.
दरम्यान, मेहबूब शेख यांनी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मुंबईला जाण्याच्या नावाखाली तिला शहरातील एका निर्मनुष्य भागात नेत अत्याचार केल्याचा आरोप आहे.
वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,28,603 वर
या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून मेहबूब शेख यांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मेहबूब शेख यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.