breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डी. पी. त्रिपाठी यांचं निधन

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डी. पी. त्रिपाठी यांचे आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डी. पी. त्रिपाठी यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरमध्ये झाला होता. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. काँग्रेस पक्षातून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. मात्र, सोनिया गांधींना विरोध करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. १९६८ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. ते एक उत्तम वक्ते होते. त्यांची संसदेतील अनेक भाषणे गाजली. आणीबाणीच्या काळातील आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळं त्यांना तुरुंगातही जावे लागले होते.

त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ‘डी. पी. त्रिपाठी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःखी झाले. ते राष्ट्रवादीचे सरचिटणीस होते. आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि संरक्षक होते. त्यांनी दिलेलं योगदान आणि मार्गदर्शन सदैव स्मरणात राहील. राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्या दिवसापासून त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो,’ अशा शब्दांत सुळे यांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली. जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button