breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#YesBankCrisis : राणा कपूर यांच्या मुलीला विमानतळावर रोखलं !

मुंबई | येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूरला मुंबई विमानतळावर रोखण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाविरोधात लूकआऊट नोटिस बजावण्यात आली आहे. तर राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.

रोशनी कपूर ब्रिटीश एअरवेजमधून लंडनला जात होती. कपूर कुटुंबाविरोधात लूक आऊट नोटीस जारी केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 36 तास चौकशी केल्यानंतर राणा कपूर यांना 8 तारखेला पहाटे 4 वाजता ईडीकडून अटक करण्यात आली. मुलगी रोशनी कपूर ही लंडनला जाता असताना तिला मुंबई विमानतळावर अडवण्यात आलं आहे.

राणा कपूर यांच्यासोबतच त्यांची पत्नी बिंदू कपूर, मुलगी राखी कपूर टंडन, राधा कपूर आणि रोशनी कपूर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध ईडीने लूकआउट नोटीस बजावली. येस बँकेने डीएचएफला 3700 कोटींच कर्ज दिले आहे. डीएचएफने ‘DOIT URBAN INDIA PVT LTD’ कंपनीला 600 कोटींच कर्ज दिलं. ही कंपनी राणा कपूर यांच्या दोन्ही मुली रोशनी आणि राधा यांच्या नावावर आहेत. दोघीच या कंपनीच्या 100 टक्के मालकीन आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button