breaking-newsमहाराष्ट्र
राज्यात गेल्या 24 तासात 303 पोलिसांना कोरोनाची लागण
मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 303 पोलिसांना कोरोनाची लागण असून, 5 पोलिसांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत सुमारे 13 हजार 180 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून सध्या 2 हजार 389 पोलिसांना राज्यात उपचार सुरु आहे. उपचारादरम्यान आतापर्यंत 136 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे.
महाराष्ट्र कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला असून कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून महाराष्ट्र पोलिस रात्रंदिवस रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहे.