राज्यात गेल्या 24 तासांत 23 हजार 365 नव्या रुग्णांची नोंद
![# Covid-19: Worrying! Even after vaccination, many suffer from coronary heart disease](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-2.jpg)
मुंबई – राज्यात गेल्या 24 तासांत 23 हजार 365 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी 474 मृतांची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जातेय. तर आज 17 हजार 559 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कालच्या नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण बाधितांचा आकडा 11 लाख 21 हजार 221 पर्यंत पोचला आहे. यामध्ये 30 हजार 883 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर, 7 लाख 92 हजार 832 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.तर सध्या 2 लाख 97 हजार 125 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात पुणे जिल्ह्यात सध्या ८२ हजार १७२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात मिळून ३१ हजार ७६६ रुग्ण उपचार घेत आहेत, ठाणे जिल्ह्यात २८ हजार ८४६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यात हाच आकडा २१ हजार ५३३ इतका आहे. नाशिक, सांगली, रायगड या जिल्ह्यांत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० हजारपेक्षा अधिक आहे.
दरम्यान, मुंबईत बुधवारी २३५२ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ५० जणांचा मृत्यू झाला. दररोज दोन हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली असून, सध्या ३१ हजारांहून अधिक रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
मुंबईतील रुग्णवाढीचा वेग सध्या १.२८ वर गेला आहे. ऑगस्टमध्ये एक टक्क्यापेक्षाही कमी असलेला हा दर काही विभागांत दीड टक्क्य़ांपर्यंत पोहोचला आहे. त्यातही बोरिवली, दहिसर, अंधेरी-जोगेश्वरी पश्चिम, कांदिवली, वांद्रे पश्चिम, मुलुंड, ग्रॅन्टरोड या भागांत रुग्णवाढ अधिक आहे. येथे दररोज सरासरी १०० रुग्णांची नोंद होत आहे.