Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीमहाराष्ट्र
राज्यात गेल्या २४ तासात ९५१८ नवे कोरोना बाधीत रुग्ण वाढले
मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात ९५१८ नवे कोरोना बाधीत रुग्ण वाढले आहेत. तर आज ३९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यांत एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३,१०,४५५ इतकी झाली आहे. राज्यात आतत्तापर्यंत एकूण १,६९,५६९ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या एकूण १,२८,७३० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत आज १०४६ नवे रुग्ण आढळेल आहेत तर ६४ जणांची मृत्यू झाला. मुंबईत सद्यस्थितीला १,०१,२२४ इतके रुग्ण असून ५७११ जणांची आत्तापर्यंतची मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यात अनेक जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन जारी केला जात आहे.