breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 15,17,434 वर

  • मुंबईत 2,203, पुण्यात 1,795 नवे रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. शनिवारी आढळलेल्या 11 हजार 416 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 15 लाख 17 हजार 434 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 308 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 40 हजार 040 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 26 हजार 440 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 12 लाख 55 हजार 779 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 2 लाख 21 हजार 156 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत शनिवारी कोरोनाचे 2 हजार 203 नवे रुग्ण आढळले, तर 48 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 27 हजार 276 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 391 इतका झाला आहे. तसेच दिवसभरात 3 हजार 074 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईतील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 92 हजार 096 वर पोहोचली आहे, तर सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 22 हजार 369 इतकी झाली आहे.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात 1 हजार 795 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 40 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 05 हजार 144 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 7 हजार 114 इतका झाला आहे. तसेच दिवसभरात 2 हजार 084 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 2 लाख 65 हजार 436 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, शनिवारी आढळलेल्या 1 हजार 795 नव्या रुग्णांपैकी 703 रुग्ण पुणे शहरातील असून 440 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे आता पुणे शहराची एकूण रुग्णसंख्या 1 लाख 53 हजार 600 एवढी झाली आहे, तर पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधितांची संख्या 83 हजार 433 वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button