राज्यात आज 7345 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ – आरोग्य मंत्री राजेश टोपे
![Health Minister Rajesh Tope urges BPL citizens to get free corona vaccine](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/RAJESH-TOPE.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात आज सोमवारी (दि. ७) 7 हजार 345 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर नवीन 3 हजार 075 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 17 लाख 30 हजार 715 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 75 हजार 767 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.98 टक्के झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. नुकतेच या बाबत त्यांनी ट्वीट केले आहे.
देशात व राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अजूनही चिंता कायम असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने वारंवार सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. राज्यात सध्या 75 हजार 767 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज दिवसभरातील रुग्णाची संख्या सात हजारावर गेली आहे. सोमवारी (दि. ७) 7 हजार 345 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर नवीन 3 हजार 075 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. वाढती रुग्ण संख्या पुन्हा चिंतेचा विषय बनत असल्यचे चित्र आहे.