राज्यातील जवळपास 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-4.png)
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. अशातच संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्याला सरकारकडून दिलासा मिळाला आहे. राज्यातील जवळपास १९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवारांनी बुधवारी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात ट्विट करत ही माहिती दिली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Capture.png)
अजित पवार यांनी ट्विटमध्ये सांगितले की, ‘महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत मंगळवार ३१ मार्च २०२० पर्यंत राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११९६६.२१ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे.’ तसंच, ‘जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ५४०७.१३ कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे. तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६५५९.८० कोटी रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली.’, असल्याचे त्यांनी सांगितले.