राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,50,171 वर
![The number of corona victims in the state is 19,50,171](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/CoronavirusSARS-CoV-2deCDCenUnsplash-1.jpg)
- मुंबईत 539, पुण्यात 373 नवे रुग्ण
मुंबई – मंगळवारी दिवसभरात आढळलेल्या 3,160 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19,50,171 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 2,828 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 64 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 18,50,189 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 49,759 वर पोहोचला आहे. तर सध्या 49,067 रुग्ण उपचार घेत आहेत.
वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,03,74,932 वर
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 539 नवे रुग्ण आढळले, तर 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,95,525 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,147 इतका झाला आहे. तसेच काल 379 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,76,413 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 7,094 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
त्याचबरोबर सुरुवातीला दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 373 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,65,396 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,863 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 414 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,51,082 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 373 नव्या रुग्णांपैकी पुणे शहरातील 233, पिंपरी-चिंचवडमधील 140 रुग्णांचा समावेश आहे