breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,28,603 वर

  • मुंबईत 714, पुण्यात 628 नवे रुग्ण

मुंबई – बुधवारी दिवसभरात आढळलेल्या 3,537 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19,28,603 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 4,913 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 70 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 18,24,934 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 49,463 वर पोहोचला आहे. तर सध्या 53,066 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाचे 714 नवे रुग्ण आढळले, तर 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,92,722 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,107 इतका झाला आहे. तसेच काल 594 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,72,464 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 8,292 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर सुरुवातीला दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 628 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,72,103 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 7,760 इतका झाला आहे. तर सध्या 13,743 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 628 रुग्णांपैकी पुणे शहरातील 294, पिंपरी-चिंचवडमधील 161 आणि पुणे ग्रामीण भागातील 173 रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button