राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17,68,695 वर
![The number of corona victims in the state is 25,64,881](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/1800x1200_coronavirus_1.jpg)
मुंबई – शुक्रवारी दिवसभरात आढळलेल्या 5,640 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 17,68,695 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 6,945 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 155 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 16,42,916 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 46,511 वर पोहोचला आहे. तर सध्या 78,272 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे 1,031 नवे रुग्ण आढळले, तर 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,73,480 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,637 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 553 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली, यासह मुंबईत आतापर्यंत 2,50,456 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 9,046 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 785 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 23 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,34,511 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,254 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 634 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,16,628 जण कोरोनामुक्त झाले आहेत.