breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४,४३,४०९ वर

  • मुंबईत २,१०९, पुण्यात २,३७३ नवे रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. रविवारी आढळलेल्या 13 हजार 702 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 14 लाख 43 हजार 409 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 326 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 38 हजार 084 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 15 हजार 048 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 11 लाख 49 हजार 603 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 2 लाख 55 हजार 281 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत रविवारी कोरोनाचे 2 हजार 109 नवे रुग्ण आढळले, तर 48 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 13 हजार 652 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 108 इतका झाला आहे. तसेच मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजार 904 इतकी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोनाच्या 2 हजार 373 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 66 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 94 हजार 011 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 6 हजार 816 इतका झाला आहे. तसेच रविवारी आढळलेल्या 2 हजार 373 नव्या रुग्णांपैकी 993 रुग्ण पुणे शहरातील असून 544 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे पुणे शहराची एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 49 हजार 399 इतकी झाली आहे, तर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 80 हजार 480 वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button