राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३,८४,४४६ वर
![# Covid-19: 14,989 new corona patients found in 24 hours in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-3.jpg)
- मुंबईत २,६५४, पुण्यात ३,२९८ नवे रुग्ण
मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. बुधवारी आढळलेल्या १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता १३ लाख ८४ हजार ४४६ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ४८१ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा ३६ हजार ६६२ इतका झाला आहे. तसेच एका दिवसात १९ हजार १६३ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली, यासह राज्यात आतापर्यंत एकूण १० लाख ८८ हजार ३२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाचे २ हजार ६५४ नवे रुग्ण आढळले, तर ४६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या २ लाख ५ हजार १४२ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ८ हजार ९२६ इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ६९ हजार २६८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या २६ हजार ५४० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोनाच्या ३ हजार २९८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ८४ हजार २१ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ६ हजार ५२९ इतका झाला आहे. तसेच एका दिवसात १ हजार ४३१ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्याचबरोबर बुधवारी आढळलेल्या ३ हजार २९८ नव्या रुग्णांपैकी १ हजार ३३६ रुग्ण पुणे शहरातील असून ७६४ रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे पुणे शहराची एकूण रुग्णसंख्या आता १ लाख ४५ हजार २९१ इतकी झाली आहे, तर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या ७८ हजार ८१ वर पोहोचली आहे.