breaking-newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ९१ हजार ४४० वर

मुंबई – महाराष्ट्रात मंगळवारी ७ हजार ७१७ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ९१ हजार ४४० वर पोहोचली आहे. तर दिवसभरात २८२ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनाबळींचा आकडा १४ हजार १६५ इतका झाला आहे. दरम्यान, मंगळवारी १० हजार ३३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यासह राज्यात आतापर्यंत २ लाख ३२ हजार २७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १ लाख ४४ हजार ६९४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत दररोज १ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडते. मात्र मंगळवारी याठिकाणी आतापर्यंत दिवसभरातील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी दिवसभरात मुंबईत केवळ ७०० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यासह मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १० हजार ८८२ वर पोहोचला आहे. तर एका दिवसात ५५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील कोरोनाबळींची संख्या ६ हजार १८७ इतकी झाली आहे.

पुणे शहरात मंगळवारी दिवसभरात १ हजार १३३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार १३० नवे रुग्ण आढळून आले. यासह पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७५ हजार ४०० वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ५५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या आता १ हजार ७९२ इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button