breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२,४२,७७० वर

  • मुंबईत १,८३७, पुण्यात ३,२९१ नवे रुग्ण

मुंबई – जगावर कोसळलेले कोरोना संकट महाराष्ट्रात थैमान घालत आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. काल दिवसभरात राज्यात १८ हजार ३९० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १२ लाख ४२ हजार ७७० इतकी झाली आहे. तर दिवसभरात ३९२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून राज्यातील कोरोनाबळींचा आकडा ३३ हजार ४०७ वर पोहोचला आहे. तर एका दिवसात २० हजार २०६ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ९ लाख ३६ हजार ५५४ इतकी झाली आहे. तसेच सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २ लाख ७२ हजार ४१० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मंगळवारी १ हजार ८३७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ४७ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. यासह मुंबईची कोरोना रुग्ण संख्या आता १ लाख ८७ हजार ७७८ वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा ८ हजार ५४९ इतका झाला आहे. तसेच मुंबईत आतापर्यंत १ लाख ५२ हजार २०४ व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून सध्या २६ हजार ६४४ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

पुणे जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात एकूण ३ हजार २९१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यात पुणे शहरातील १ हजार ३६४ रुग्णांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात दिवसभरात ९६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता २ लाख ५७ हजार ७९७ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ५ हजार ८७० इतका झाला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख १० हजार ५५१ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button