breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८,२५,७३९ वर

  • मुंबईत १,६२२, पुण्यात ३,५३५ नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. बुधवारी दिवसभरात राज्यात 17 हजार 433 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 292 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 8 लाख 25 हजार 739 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 25 हजार 195 इतका झाला आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. काल एका दिवसात राज्यात 13 हजार 959 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यासह राज्यात आतापर्यंत 5 लाख 98 हजार 496 जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 2 लाख 1 हजार 703 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत बुधवारी दिवसभरात 1 हजार 622 नव्या रुग्णांची भर पडली, तर 34 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 48 हजार 569 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 7 हजार 724 इतका झाला आहे. तसेच मुंबईत सध्या 20 हजार 813 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 19 हजार 702 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सप्टेंबर महिना उजाडला तरी पुणेकरांना कोरोनाबाबत दिलासा मिळेनासा झाला आहे. बुधवारी जिल्ह्यात पुन्हा एकदा ३ हजार ५३५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यात पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ६३४ रुग्णांचा समावेश आहे. तर एका दिवसात ७४ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १ लाख ७७ हजार २८२ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ४ हजार २५७ इतका झाला आहे. तसेच पुण्यात आतापर्यंत १ लाख ३७ हजार ६३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button