breaking-newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६,८२,३८३ वर

मुंबई – महाराष्ट्रात रविवारी १० हजार ४४१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर २५८ मृत्यू नोंदवले गेले. तसेच दिवसभरात ८ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ६ लाख ८२ हजार ३८३ वर पोहोचली असून त्यापैकी ४ लाख ८८ हजार २७१ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या १ लाख ७१ हजार ५४२ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाबळींची संख्या २२ हजार २५३ इतकी झाली आहे. राज्याचा रेट हा ७१.५५ एवढा झाला आहे. तर मृत्यूदर हा ३.२६ एवढा आहे.

मुंबईत रविवारी दिवसभरात कोरोनाचे ९९१ नवे रुग्ण आढळले, तर ३६ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात ६९० जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १ लाख ३६ हजार ३४८ वर पोहोचली आहे. यापैकी १ लाख १० हजार ५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात २ हजार ५८० नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यात पुणे शहरातील १ हजार २२५ रुग्णांचा समावेश आहे. तर दिवसभरात २ हजार ४०६ जण कोरोनामुक्त झाले असून ६१ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यासह पुणे शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख ४५ हजार ४१ वर पोहोचली आहे. तर कोरोनाबळींचा आकडा ३ हजार ५५६ इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत १ लाख १० हजार २९१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button