breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उचलबांगडीची शक्यता

मुंबई | राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यात केंद्रस्थानी राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भाजपकडून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत भाजपकडून सत्तास्थापनेसाठी अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले. या सगळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला झुकते माप दिल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला. या सगळ्यामुळे भाजपची प्रतिमा मलीन झाली होती. त्यामुळेच आता भाजपकडून डॅमेज कंट्रोलसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बदली केली जाऊ शकते.

सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आता राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांची वर्णी लागू शकते. गेल्यावर्षीच कलराज मिश्र यांच्याकडे राजस्थानच्या राज्यपालपदाचा कारभार सोपवण्यात आला होता. तत्पूर्वी ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button