breaking-newsTOP Newsमहाराष्ट्र
राजेश टोपेंची मोठी घोषणा,हॉस्पिटलचं बिल आधी ऑडिटरकडे, मग रुग्णांना देणार
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमधील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह स्थानिक प्रशासनाने बैठक घेऊन, नाशिकमधील सद्यस्थितीवर मंथन केलं. यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी शरद पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं सांगितलं. “राज्यातील 3000 हेल्थ ऑफिसर सेवेसाठी उपलब्ध करणार आहोत. सर्व ऑडिटर्सला एक एक हॉस्पिटलची जबाबदारी देण्यात येईल. ऑडिटर्सने तपासणी केल्यानंतरच बिल रुग्णांना दिल जाईल”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.