breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राजकारणात खळबळ! भाजपच्या 7 आमदारांचा अजित पवारांना फोन

मुंबई:- सत्तास्थापनेस असमर्थ ठरल्यानंतर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपच्या 7 आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले हे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

अजित पवारांना फोन करणारे सातपैकी 2 आमदार सातारा जिल्ह्यातील तर एक आमदार पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. गरज पडल्यास आम्ही राजीनामा देऊ, असं या आमदारांनी अजित पवारांना सांगितल्याचं कळतंय. या आमदारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यास भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button