breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
‘रस्त्याची चुकीचं कामं केल्यास कंत्राटदाराला चौकात शिक्षा द्यायला हवी’
नागपूर |महाईन्यूज|
एखाद्या कंत्राटदाराने रस्त्यांची चुकीचं काम केल्यास, त्या कंत्राटदाराला भर चौकात शिक्षा द्यायला हवी, तसेच वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे नंबर छापायला हवेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
नागपूर येथील रस्ता सुरक्षाविषयक कार्यक्रमात ते बोलत होते. चुकीची कामं करणाऱ्या कंत्राटदारांना गडकरींनी एकप्रकारे इशाराच दिला आहे.
गडकरी पुढ म्हणाले की, जेवढे लोक दहशतवादी हल्ल्यात मरत नाहीत, त्यापेक्षा जास्त लोक रस्ते अपघातात मरतात. दरवर्षी रस्ते अपघातात भारतात दीड लाख लोकांचा मृत्यू होत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.