breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘मुस्लिम समाजाला आरक्षण देणारच’ – बाळासाहेब थोरात

अहमदनगर | ‘आमच्या मनात कोणाच्याही बाबत द्वेषभावना नसल्याने आम्ही मुस्लिम समाजाला आरक्षण देणारच.’ असा टोला काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नावं न घेता भाजपाला लगावला आहे.

मुस्लिम समाजाला ५% आरक्षण देण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयानंतर धर्माच्या आधारावर कोर्टात आरक्षण टिकणार नसल्याने महाविकास आघाडी मुस्लिम समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

दरम्यान, कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की, ‘कोर्टात धर्माच्या आधारे नव्हे तर मुस्लfम समाजात असलेल्या गरीब घटकांच्या आधारे आरक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये विशेषतः गरिबांना न मिळणाऱ्या शिक्षणावर हे आरक्षण देण्यात येणार आहे.’

कोर्टानेही मुस्लिम आरक्षणासंदर्भात काही बाबींचा स्वीकार केला आहे. त्यामुळे आम्ही ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मुस्लिमांना आरक्षण देणार असल्याची माहिती मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे

‘मुस्लिमांना ५% आरक्षण देण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयानंतर सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपाला काहीही महत्त्व नसून फडणवीस सरकारने जर आधीच मुस्लिम आरक्षणाबाबत विधेयक पास करून कायदा केला असता तर आम्हाला हे करायची गरजच नसती.

मात्र आमचं सरकार हे सर्वाना सोबत घेऊन चालणारं सरकार असून आमच्यात कुणाबद्दल ही द्वेषभावना नसल्याने आम्ही मुस्लिमांना आरक्षण देणार आहोत.’ असं थोरात म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button