breaking-newsमहाराष्ट्र

मुली पळवून आणू असं वक्तव्य करणाऱ्या राम कदमांवर जितेंद्र आव्हाड बरसले

घाटकोपर येथील भाजपाचे आमदार राम कदम यांनी सोमवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. भारतातील सर्वात मोठी हंडी म्हणून आयोजित केलेल्या या उत्सवामध्ये अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. मात्र याच उत्सवामध्ये गोविंदांशी संवाद साधताना राम कदम यांनी महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप राष्ट्रवादी क्राँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून राम कदम यांचा एक व्हिडीओ ट्विट करत हा आरोप केला आहे.

राम कदम यांच्या भाषणाची क्लिप शेअर करत आव्हाड म्हणतात, ‘बेताल वक्तव्य करणारा भाजपा नेत्यांमध्ये आणखी एकाची भर. रक्षाबंधन, दहिकाला उत्सव या पवित्र सणांच्या दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे! ट्विटच्या शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी कदम यांच्यावर टीका केली. कशा राहतील यांच्या राज्यात महिला सुरक्षित? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले आहेत राम कदम व्हिडीओमध्ये?

कदम यांचा ५४ सेकंदांचा व्हिडिओ आव्हाड यांनी शेअर केला आहे. व्हिडिओत कदम यांनी गोविंदाना तुम्हाला पसंत असलेली मुलगी पळवून आणून तुम्हाला देणार असे वक्तव्य केल्याचे दिसते. उपस्थित गोविंदाना आपल्याशी संपर्क साधण्यासाठी कदम यांनी स्वत:चा फोन नंबर देताना हे वक्तव्य केले. कदम आपला मोबाइल नंबर देण्यास सुरुवात करतात आणि त्यानंतर स्टेजवरील समालोचक कोणतही काम असेल तर साहेबांना (राम कदम यांना) भेटू शकता असं सांगतो. ‘साहेब मी तिला प्रपोज केलं ती मला नाही म्हणतेय मला मदत करा’, या कामासाठीही मी तुमची मदत करायला तयार आहे, असे राम कदम यांनी सांगितले. यावर उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे लक्षात येताच राम कदम यांनी स्पष्टीकरणही दिले. ‘मी शंभर टक्के मदत करणार. आधी तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायचं. तुमचे आई-वडील म्हटले आम्हाला ही पोरगी पसंत आहे. तर काय करणार मी? तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार’ असे त्यांनी सांगितले.

Dr.Jitendra Awhad

@Awhadspeaks

बेताल वक्तव्य करणारा भाजपा नेत्यांमध्ये आणखी ऐकाची भर.. रक्षाबंधन , दहिकाला उत्सव या पवित्र सणा दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे !
कशा राहतील यांचा राज्यात महिला सुरक्षित?

मुलगी पळवून आणण्याच्या याच वक्तव्यावरून आव्हाड यांनी कदम यांच्यावर टिका केली. सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या आमदारानेच असे वक्तव्य केल्याने कशा राहतील यांच्या राज्यात महिला सुरक्षित?, असा सवालही आव्हाडांनी विचारला. जितेंद्र आव्हाड यांच्या या टीकेवर राम कदम यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button