breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
मुख्यमंत्र्यांची सपत्नीक वर्षा बंगल्यावर विठ्ठलाची महापूजा
मुंबई – आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सपत्नीक वर्षा बंगल्यावर विठ्ठलाची महापूजा केली. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, सकलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या चरणी केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यास विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी पंढरपुरात न जाण्याचा निर्णय रविवारीच जाहीर केला. व पहिल्यांदाच वर्षा बंगल्यावर महापूजा करण्यात आली.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील भगवती गावातील (ता.शेणगाव) वर्षा आणि अनिल गंगाधर जाधव या शेतकरी दाम्पत्याने आज पंढरपूरमध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा केली.