Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली लता दीदींची भेट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/uddhav-lata-didi.jpg)
मुंबई | महाईन्यूज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रीचकँडी रुग्णालयात जाऊन गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्या रुग्णालयात दाखल आहेत.लता मंगेशकर यांना ११ नोव्हेंबरपासून ब्रीचकँडी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. निमोनिया आणि श्वसनाचा त्रास या दोन कारणांमुळे त्यांना ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.
जागतिक किर्ती लाभलेले आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. फारुख उद्वारिया यांच्या देखरेखीखाली लता मंगेशकर यांच्यावर उपचार केले जात आहेत.