Breaking-newsमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय
मुंबई विमानतळावर एअर फोर्सचे AN-32 विमान धावपट्टीवरुन घसरले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/FLIGHT-MUMBAI.jpg)
इंडियन एअर फोर्सचे एएन-३२ विमान मंगळवारी रात्री मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरुन उड्डाण करताना घसरले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मुंबईवरुन हे विमान कर्नाटकातील एअर फोर्सच्या येलहंका तळावर निघाले होते.
विमानतळाच्या २७ नंबरच्या धावपट्टीवर हा अपघात घडला. सध्या ३२ नंबरच्या धावपट्टीचा उपयोग केला जात आहे. सध्या एक धावपट्टी बंद असून विमान वाहतूक २० मिनिट विलंबाने सुरु आहे. एएन-३२ हे मोठे विमान असून मालवाहतुकीसाठी या विमानाचा उपयोग केला जातो.
रात्रीच्या वेळी मुंबईवरुन विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसला. विमानतळावर मोठी रांग लागली होती. काही विमाने दुसऱ्या विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आली.