breaking-newsपुणेमहाराष्ट्रमुंबई
मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. खोपोलीजवळ मोठे झाड पडल्याने दोन्ही दिशेने येणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. काही वेळातच महामार्गावर पुणे आणि मुंबईकडून येणाऱ्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. सोमवार असल्याने आज कार्यालयीन कामकाजासाठी पुण्याहून मुंबईला तसेच मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. त्यामुळे महामार्गावर एसटी महामंडळाच्या बस, खासगी बस तसेच चारचाकी वाहनांची मोठी गर्दी असते. मात्र ऐन गर्दीच्या वेळेला झाड कोसळल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे.