Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
मुंबईत वरळीजवळच्या समुद्रात बोट बुडाली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Worli.jpg)
मुंबईतील वरळीजवळच्या समुद्रात एक बोट बुडाल्याची माहित समोर येते आहे. बोटीत सातजण होते त्यापैकी एकजण बेपत्ता आहे असंही समजतं आहे. रेवती असं या बोटीचं नाव होतं अशीही माहिती समोर आली आहे. या बोटीत सातजण होते ज्यापैकी सहाजण सुखरूप आहेत तर एकजण बेपत्ता आहे असंही समजतं आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
भारतीय तटरक्षक दलाने या सातपैकी सहाजणांची सुखरूप सुटका केली आहे. मुंबईत आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सातपैकी सहाजणांवर प्रथमोपचार करण्यात आले आहेत. आता कोस्ट गार्डच्या दोन बोटी आणि हेलिकॉप्टर बेपत्ता झालेल्या एकाचा शोध घेत आहे.