Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
मुंबईत पाणी तुंबलंच नाही, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा दावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Vishwanath-Mahadeshwar.jpg)
मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला असून रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतूक प्रचंड धीम्या गतीने सुरु आहे. यासोबत मुंबईत हिंदमाता, सायन, परळ, दादर अशा अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा वागला. अनेकांना पाण्यातून वाट काढत आपल्या इच्छितस्थळी पोहोचावं लागलं. मात्र मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत पाणी तुंबलंच नाही असा दावा केला आहे.