breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत क्षयरोगाच्या रुग्णांत १० टक्क्य़ांनी वाढ

१५ टक्के रुग्णांनी उपचार अध्र्यावर सोडल्याचा अहवाल

मुंबई : क्षयरोग निर्मूलनासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी मुंबईत या आजारावर नियंत्रण मिळविण्यात अपयश आल्याचा निष्कर्ष ‘प्रजा फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने रुग्णांच्या माहिती अधिकाराखाली मिळविलेल्या आकडेवारीवरून काढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत क्षयरोगाच्या रुग्णांच्या संख्येत चालू वर्षांत १० टक्क्य़ांनी वाढ झाल्याचा दावा प्रजाने केला आहे. विशेष म्हणजे क्षयरोगावर उपचार सुरू असताना १५ टक्के  म्हणजे २ हजार २५७ रुग्णांनी उपचार अर्धवट सोडून दिल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

प्रजाने सालाबादप्रमाणे गुरुवारी मुंबईकरांची आरोग्यविषयक श्वेतपत्रिका काढली. यात मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याची परिस्थिती काय आहे आणि शासन तसेच पालिकेतर्फे काय उपायायोजना केल्या जातात याचा लेखाजोखा मांडण्यात आला. या अहवालात त्यांनी मुंबईकरांच्या ढासळत्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. क्षयरोगींची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्क्य़ांनी वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे. २०१६-१७ या वर्षांत मुंबईत क्षयाच्या ५० हजार रुग्णांची नोंद होती. तर २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षांत ती वाढून ५५ हजार १३० झाल्याची माहिती प्रजाने दिली आहे.

क्षयरोग हा हवेतून पसरणारा आजार आहे. त्यामुळे राज्य सरकार व पालिका क्षयरोगावर नियंत्रण आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती मोहीम राबवीत आहे. मात्र प्रजा फाऊंडेशनने माहिती अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीने या मोहिमांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी राज्य सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपचार (डॉट) घेणाऱ्या रुग्णसंख्येत घट होते आहे.

२०१३ मध्ये २१ हजार ५५० रुग्णांनी क्षयरोग निर्मूलनासाठी नोंदणी केली होती. मात्र ही संख्या २०१७ मध्ये १५ हजार ५५० इतकी कमी झाली आहे. उपचारांचे प्रमाण कमी होत असल्याने क्षयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत यावर्षी २ हजार ३७३ लाख रुपयांची तरतूद केली होती. मात्र आतापर्यंत यातील ७१ टक्के निधीचा वापर विविध कारणांसाठी करण्यात आला आहे. प्रजाचा हा नववा अहवाल असून माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवून तसेच हंसा रिसर्च कं पनीच्या साहाय्याने हा अहवाल तयार क रण्यात आला आहे.

५५ हजार रुग्णांची नोंद

क्षयरोगींची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्क्य़ांनी वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे. २०१६-१७ या वर्षांत मुंबईत क्षयाच्या ५० हजार रुग्णांची नोंद होती. तर २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षांत ती वाढून ५५ हजार १३० झाल्याची माहिती ‘प्रजा’ने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button