breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईतील केटरिंंग व्यावसायिकांना एफडीएने दिले अन्नसुरक्षेचे धडे; ‘इट राइट इंडिया’ मिशन

मुंबई | महाईन्यूज

मुंबई शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक दाखल होतात. विविध व्यवसाय, नोकरी, उद्योगधंदे इत्यादी कामांमुळे नागरिकांना बाहेरील अन्नपदार्थांवर अवलंबून राहावे लागते. समारंभ, कार्यक्रम आदींसाठी कॅटरिंग व्यावसायिक अन्नपदार्थांचा पुरवठा करत असतात. नागरिकांना सुरक्षित, निर्भेळ व आरोग्यदायी अन्नपदार्थ मिळत नाहीयेत. अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली आणि अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ‘इट राइट इंडिया’ मिशन सुरू करण्यात आले आहे. या मिशनद्वारे कॅटरिंग सेवा पुरविणा-या व्यावसायिकांची कार्यशाळा घेऊन, सुरक्षित, निर्भेळ व आरोग्यदायी अन्नपदार्थ कसे पुरविता येतील, याचे मार्गदर्शन केले जाते आहे.

अन्न व औषध प्रशासनातर्फे कॅटरिंग सर्व्हिस देणाºया व्यावसायिकांमध्ये स्वच्छता, सुरक्षित अन्न बनविणे, बनविलेले अन्न योग्य पद्धतीने हाताळून नागरिकांपर्यंत पोहोचविणे, याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी नुकतेच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. ही कार्यशाळा अन्न व औषध प्रशासनाच्या रांगणेकर सभागृहात पार पडली आहे. यावेळी सुमारे १३१ अन्नसेवा पुरविणारे व्यावसायिक कार्यशाळेत सहभागी झाले होते. पी. बी. उमराणी सहायक आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई यांनी अन्नपदार्थ पुरविणाºया व्यावसायिकांना सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button