breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईतल्या डोंगरीत चार मजली इमारत कोसळली, ४५ जण अडकल्याची भीती

मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळली. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. साधारण ४० ते ४५ जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश जास्त असण्याची शक्यता आहे. मदत आणि बचावकार्य सुरु असताना पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. चिंचोळी गल्ली असल्याने या ठिकाणी मदतकार्यात अडथळे येत आहेत.

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Mumbai: Four-storey Kesarbai building has collapsed in Dongri. More than 40 people are feared trapped.

61 people are talking about this

ANI

@ANI

Mumbai: A four-storey building has collapsed in Dongri area, many feared trapped, fire tenders rushed to the site; more details awaited

24 people are talking about this

मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. सकाळी ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. स्थानिकांनी ही इमारत कोसळल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलं असून मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० लोक अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. मदत व बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button