breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईच्या समुद्रात दुर्मीळ ‘सनफिश’

खोल समुद्रात वास्तव्य करून क्वचितच समुद्राच्या बाह्य़ प्रवाहात आढळून येणाऱ्या दुर्मीळ ‘सनफिश’चे रविवारी ससून बंदरात दर्शन घडले. गेल्या आठवडय़ात मुरुडच्या समुद्र क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या एका मच्छीमाराच्या जाळ्यात हा दुर्मीळ प्रजातीचा विचित्र दिसणारा ४० किलो वजनी ‘सनफिश’ सापडला होता. मात्र या माशाबद्दल अधिक माहिती नसल्याने मच्छीमाराने त्याची सुटका केली नाही. मासेमारी पूर्ण झाल्यानंतर रविवारी ससून बंदरात परतलेल्या त्या मच्छीमाराने ‘सनफिश’ला आपल्या सोबत आणले. गेल्या वर्षीदेखील अशाच प्रकारचा ‘सनफिश’ मुंबईच्या मासळी बाजारात आढळून आला होता.

मुंबईच्या सागरी परिसंस्थेत दडलेली गुपिते अधूनमधून उघडकीस येत असतात. महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात सहजा न आढळणाऱ्या दुर्मीळ सनफिशचे ससून डॉकमध्ये रविवारी दर्शन घडले. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सनफिश प्रजातीमधील ‘स्लेन्डर सनफिश’ प्रजातीचा मासा क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी बाजारात आढळून आला होता. हा मासा त्या वेळी वसई ते मुंबईपर्यंतच्या समुद्रात स्थानिक मच्छीमाराला सापडला होता. त्याचे वजन सुमारे तीन किलो आणि लांबी दोन फूट एवढी होती.

मात्र आता तब्बल चाळीस किलो वजनी आणि तीन फूट लांब असलेला ‘ऑशन सनफिश’ प्रजातीचा सनफिश ससून बंदरातील मच्छीमाराला सापडला आहे. गेल्या आठवडय़ात मुरुडच्या समुद्र क्षेत्रात मासेमारी करताना एका मच्छीमाराच्या जाळ्यात हा सनफिश सापडल्याची माहिती ‘महाराष्ट्र पर्ससीन फिशर वेल्फेअर असोसिएशन’चे उपाध्यक्ष आणि मच्छीमार गणेश नाखवा यांनी दिली. संबंधित मच्छीमाराला या मत्स्य प्रजातीबाबत अधिक माहिती नसल्याने मच्छीमाराने त्याची सुटका केली नाही. त्यामुळे मासा मृत पावल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सनफिश दुर्मीळ असल्याने त्याचे जतन करण्याच्या उद्देशाने मच्छीमाराला सनफिश ससून डॉकमध्ये आणण्यास सांगितल्याचे नाखवा म्हणाले. त्यानुसार मच्छीमार या माशाला घेऊन ससून बंदरात दाखल झाला. येत्या दोन दिवसांत हा मासा केंद्रीय समुद्री मत्स्यकी संशोधन केंद्राचे जीवशास्त्रज्ञ या मासाला आपल्या ताब्यात घेणार आहे.

सनफिश ऑशन सनफि श (मोला मोला)

प्रजातीचा आहे. हाडांची संरचना असलेल्या मत्स्य प्रजातींमधील हा मासा सर्वात वजनदार असून त्याची अंडी देण्याची क्षमतादेखील सर्वात अधिक आहे. सुमारे २०० ते ६०० मीटर समुद्रखोलीत याचे वास्तव्य असते. जेलीफिश, स्विड, छोटे मासे या प्रकारचे असे सनफिशचे खाद्य आहे. – स्वप्निल तांडेल, सागरी जीव संशोधक

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button