breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माढ्यातून शरद पवाराची माघार?, पार्थ पवार मावळमधून लढणार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. शरद पवार हे निवडणूक लढणार नाहीत. शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, दगाफटका होण्याच्या भीतीने पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.

पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी आग्रह होता. शेतकरी कामगार पक्षानेही पार्थ यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एकाच कुटुंबात किती उमेदवार म्हणून आम्ही कुंटुंबाने आणि पक्षाने चर्चा केली. शिवाय माझी राज्यसभा टर्म अजून शिल्लक आहे, कौटुंबीक चर्चेनंतर मी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, असं शरद पवार म्हणाले.

माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा 

माढा लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. सध्या इथे  राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील हे विद्यमान खासदार आहेत. मात्र खुद्द विजयसिंह मोहिते पाटलांनीच पवारांना माढ्यातून लढण्याची विनंती केली. त्यामुळे निवडणूक न लढण्याची घोषणा केलेल्या शरद पवारांना पुन्हा निवडणुकीच्या रणांगणात उतरावं लागलं. यंदा शरद पवार हे माढ्यातून लढणार असल्याने येथील चुरस वाढली आहे. तसेच, राज्याचंही लक्ष या मतदारसंघाकडे लागलं आहे.  स्वत: पवार लढत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात  सातारा जिल्ह्यातील तीन विधानसभा येतात. या सर्व परिस्थितीचा आढावा शनिवारी पवारांनी घेतला होता. त्यानंतर आज पुन्हा बैठक होत आहे. तर पवारांनी 21 फेब्रुवारीला माढ्यातील पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक घेतली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख, पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

माढा लोकसभा मतदारसंघ

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्या निवडणुकीत पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मते मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते मिळाली होती.

2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून येथे विद्यमान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू स्व. प्रतापसिंह मोहित पाटील यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली व निवडणूक लढविली होती. 2014 ला देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना माढा मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला होता. ही लढत खोत व मोहिते पाटील यांच्यात अत्यंत चुरशीने झाली. या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button