माढा मतदार संघातून संजय शिंदे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
पुणे – शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मला लोकसभेला माढा येथून उभं रहा असा आग्रह सगळ्यांनी केला होता. यासंदर्भात टेंभुर्णीला एक बैठक झाली त्या बैठकीत मला तुम्ही निवडणुकीला उभे रहा अशी विनंती करण्यात आली. संजय शिंदे हे घरातलेच आहेत, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असं का म्हणायचं? ते घरातलेच आहेत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघातर्फे आणि काँग्रेसच्या सहमतीने मी संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर करतो आहे असं शरद पवार यांनी जाहीर केलं आहे.
माढा येथील लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर ही उमेदवारी कोणाला दिली जाणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. ही उमेदवारी राष्ट्रवादीतर्फे संजय शिंदे यांना जाहीर करण्यात आली आहे. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी राणा जगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याचंही शरद पवार यांनी जाहीर केलं.