माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Adarsh-scam-Cle33768.jpg)
लातूर : महाराष्ट्राच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 89 वर्षीय शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना गेल्या तीन दिवसांपासून लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांनी तपासणी केली असता कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. ते लातूर जिल्ह्यातील निलंगा इथं राहतात. आता त्यांना उपचारासाठी पुण्याला हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक मंत्री, आमदार, खासदार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विद्यमान मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अशोक चव्हाण यांना 25 मे रोजी कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नांदेडवरुन मुंबईला हलवलं होतं. त्यानंतर उपचाराअंती अशोक चव्हाण यांना 4 जूनला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.