breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित पतींनी घातल्या वडाला उलट्या प्रदशिक्षणा

औरंगाबाद – वटपौर्णिमेला महिला वटपूजन करून एक एक धागा गुंफत पुढील सातजन्मी मला हाच पती मिळावा, म्हणून देवाकडे साकडे घालणार! मात्र, भांडकुदळ आणि आम्हाला कोर्टकचेऱ्यात फेऱ्या मारायला लावणारी पत्नी सातजन्मी काय, पुढील सात सेकंदाकरितासुद्धा नकोशी झालीय… ही कोणा एकट्याची प्रतिक्रिया नाही! तर वाळूज येथील पत्नीपीडित पुरुष संघटनेच्या वतीने मंगळवारी वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मुंजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळाच्या झाडाला उलट्या प्रदक्षिणा घालून ही भावना मांडली! यावेळी संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्नीपीडित पुरुषांची उपस्थिती होती.

याबाबत भारत फुलारे यांनी सांगितले, की सातजन्मी हाच पती मिळावा म्हणून आमच्या बायका वटपौर्णिमेला साकडे घालतील व त्यास धागा बांधून आम्हास संकटात टाकतील. अशा संकटामुळे बहुतांश ठिकाणी पत्नी व सासू-सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून पत्नीपीडितांना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे.

एका जन्मात आमच्या पत्नीने आमच्यावर इतका अन्याय केला आहे की, त्यातून सुटका होणे अवघड आहे. त्यातच उद्या त्या सात जन्माची साथ मागतील व आम्हास अडकवून टाकतील. एकीकडे पटत नाही म्हणून गुन्हे दाखल करायचे आणि दुसरीकडे दूर राहूनही मला पुढील सातजन्मी हाच पती मिळावा, असे साकडे घालायचे. पत्नीच्या या दुटप्पी भूमिकेचा निषेध करीत संघटनेच्या वतीने साईनगर सिडको येथील विशाल पिंपळाच्या झाडाला मंगळवारी उलट्या प्रदक्षिणा घालत अनोख्या पद्धतीने पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा जाहीररीत्या माईकच्या माध्यमातून मंत्रोच्चारण स्वरूपात वाचला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे, राहुल वाढवे, संजय नरवडे, प्रमोद तरवटे, नईम शेख, रामेश्वर नवले, नितीन गारजकर, अरुण ठोंबरे, शिवराज कांबळे, कदीर शेख, मनोज परदेशी, विशाल नांदूरकर, चरणसिंग गुसिंगे, मल्लेश कुऱ्हा, कौतिक जोगदंड आदी.

विविध कलमांच्या फलकांवर गुंडाळला धागा
अनेक गुन्ह्यांमध्ये पत्नीकडून पीडित पतींविरोधात दाखल करण्यात येणाऱ्या कलमांन्वये पती पुरुषांवर तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हे दाखल करण्यात येतात. याच गुन्ह्यांचा संदर्भ घेत विविध कलमे असणाऱ्या फलकांना वृक्षाच्या बुंध्यावर चिकटवत त्याभोवती धागा गुंडाळण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button