breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

“महाराष्ट्र सरकार आता दाऊदवरीलही सर्व गुन्हे मागे घेईल आणि क्लीन चीट देईल”- मोहित भारतीय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेड आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश नुकताच दिला आहे. मात्र यामुळे विरोधी पक्षात असणाऱ्या भाजपाने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सध्या सुरु असून…घाई करा थोडेच दिवस बाकी आहेत असा टोला भाजपा मुंबईचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी आता दाऊदलाही क्लीन चीट मिळेल असाही टोला लगावला आहे.

मोहित भारतीय यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “सूत्र: दाऊदवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता आणि लवकरच महाराष्ट्र सरकारकडून क्लीन चीट देणार आहे. कारण सध्या गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सुरु आहे. घाई करा…थोडेच दिवस बाकी आहेत”.अशी टीका मोहित यांनी ट्वीट करून केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button