breaking-newsपुणेमहाराष्ट्र
महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी-काँग्रेसच सत्तेवर येईल – बापूराव सोलनकर
पुणे:- येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादी-काँग्रेसच सत्तेवर येईल असे राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते बापूराव सोलनकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे.
लोकसभा निवडणुकी मध्ये जरी भाजप चा विजय झाला असला तरी जनता विधानसभेला वेगळा विचार करत असते. भारतीय जनता पक्षाने धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, या समाजातील तरुण आरक्षणा पासून वंचित राहिले ,मुला-मुलींचे खुप मोठे शैक्षणिक नुकसान झाले ,ओबीसींचे प्रश्न या सरकारला सोडवता आले नाहीत. केवळ भूलथापा देण्यामध्ये हे सरकार पुढे असल्याचे सोलनकर म्हणाले,
काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनगर -बहुजन समाजातील तरुणांना विधानसभेला संधी दिली तर हा सर्व समाज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मागे उभा राहील, असे सोलनकर यावेळी म्हणाले.