Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाराष्ट्रात मंदिर असलेल्या शहरांमध्ये मानवी तस्करी? मुंबई उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र पोलिसांना चौकशीचे आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/kidnapping-1.jpg)
मुंबई: महाराष्ट्रातून महिला, मुली अचानक गायब होण्याचे प्रमाण वाढलेले असल्याची चर्चा आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही या प्रकरणाची दखल घेतलेली आहे.
राज्यातील महत्त्वाची मंदिरे असलेल्या शहरांमधून बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध घेण्यात यावा. तसेच, या प्रकरणांमध्ये मानवी तस्करीचा काही संबंध आहे का? हे देखील शोधावे, त्या दृष्टीने तपास करावा, असे आदेश न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना दिलेले आहेत.